दिनांक २१ मे, श्रीगोंदा:
शहरातील अनिल आनंदकर हा चित्रकार परिस्थिती सामान्य असतांनाही आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनावर कोरोना विषाणूची प्रतीकात्मक चित्रकृती बनवून कोरोना प्रादुर्भावाबाबत प्रबोधन करत गावोगावी फिरत आहे. मागील दीड – दोन महिन्यांपासून स्व:खर्चाने कोरोना साथ संक्रमनात जनजागृतीचे काम करत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

“जनजागृती रथ” असे नामकरण केलेल्या चित्ररथावर कोरोनाचा मुखवटा असलेली प्रतिकात्मक मानवी प्रतिकृती बनवण्यात आली आहे. यातून वेगवेगळे संदेश देत लोकांची जनजागृती करण्याचा हा तरुण प्रयत्न करीत आहे. या संकल्पनेच्या माध्यमांतून अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराची माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी तो धावपळ करतोय.
खेडेगावातील मायबाप जनता काटेकोर पालन करत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खेडेगावात जास्त होत आहे. सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी या वाहनावर चित्रकाराने वेगवेगळे चित्रसंदेश रेखाटले असून, निरनिराळे संदेश यात नमूद केलेले आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, साबणाने सतत हात धुवा, प्रत्येक व्यक्तीपासून सहा फुटांचे अंतर ठेवा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणून, मी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणार व इतरांनी या नियमांचे पालन करा. असे आवाहन यावर करण्यात आले आहे. awakening-of-the-corona-from-the-painters-concept
ज्या घरातील व्यक्तीला कोरोना झालेला आहे. त्यांना विचारा, संक्रमण झाल्यावर कोणाला ऑक्सिजन मिळत नाही. तर, कोणाला बेड मिळत नाही. या हाल अपेष्टापासून दूर राहण्यासाठी इतरांनी जागृत होऊन नियमांचे पालन करा. आपण सर्वजण कोरोनाला मिळून हरवू..! अशा प्रकारचे अनेक संदेश अनिल आनंदकर (चित्रकार) यांनी चित्ररथावर रेखाटले आहेत.
स्रोत:(अनिल आनंदकर यांचा चित्ररथ)
