गार येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: गार गाव ‘लोकशाहीचे शिल्पकार’ पुरस्काराने सन्मानित..

दिनांक २७ जानेवारी २०२५ गार, श्रीगोंदा:

गार येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांमधून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गार सोसायटी कार्यालयासमोर सोसायटीचे चेअरमन श्री. जितू शेठ मगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर गार ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सौ. मीनाक्षी संजय मगर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतदेखील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी शासनाच्या निर्देशानुसार तंबाखूमुक्त गावाची शपथ घेत ग्रामस्वच्छता व आरोग्यविषयक जागरूकतेचा संदेश दिला.

२६ जानेवारीच्या निमित्ताने गार ग्रामपंचायतीने ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत गार गावाने ‘मिशन ७५’ अंतर्गत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी गाठली. या यशाबद्दल मा. जिल्हाधिकारी श्री. सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला आणि महानगरपालिका आयुक्त श्री. डांगे यांच्या हस्ते गार गावाला ‘लोकशाहीचे शिल्पकार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल गार ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायतीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाला सरपंच/चेअरमन श्री. योगेश मगर, तंटामुक्त अध्यक्ष श्री. हौसराव परकाळे, माजी सरपंच श्री. सदाशिवराव जाधव, माजी चेअरमन श्री. राजेंद्र भाऊ मगर, श्री. सुभाषराव देशमुख, श्री. संजय विनायक मगर, विद्या मंदिर संचालक श्री. सोमनाथ जाधव, श्री. अकुंशराव नवले, श्री. सचिन लोखंडे, श्री. मोहन शिपलकर, उपसरपंच श्री. अनिलराव खरात यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक श्री. त्रिभुवन सर, शिक्षक वृंद, ग्रामसेविका सौ. शिंदे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गार सोसायटीचे चेअरमन श्री. जितू शेठ मगर यांनी गार गावाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading