श्रीगोंदा, दि. २४ जून २०२५:
गार व कौठा या गावांच्या शिवसीमेवरील (शिवरस्ता) मोजणीचे कार्य पूर्ण झाले असून, यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. सन २०२१-२२ पासून या मोजणीसाठी मागणी होत होती. गार ग्रामपंचायतीने ठराव करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

या कार्यासाठी तत्कालीन श्रीगोंदा तहसीलदार श्री. कुलथे साहेब व क्षितिजा वाघमारे मॅडम यांनी भूमिलेख विभागास आदेश दिले होते. त्यानुसार श्रीगोंदा येथील भुमिलेख अधिकारी पाटील आणि गार-कौठा येथील तलाठी भाऊसाहेब पोटे यांनी सटवाई मंदिर ते खरात वाडी या मार्गावरील मोजणी पूर्ण केली.

या कार्यात शिव पाणंद रस्ता चळवळीचे कार्यकर्ते दादासाहेब जंगले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता शासनामार्फत लवकरच या शिवरस्त्यासाठी निधीची तरतूद होणार असून ३३ फूट रुंद रस्ता तयार केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा फायदा होणार आहे.

तसेच हद्द निश्चिती करून त्या रस्त्यावर सिंगल फेज लाईन व इतर विकासकामे होण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. या मागणीसाठी गार सोसायटीचे चेअरमन जितू शेठ मगर, संजय विनायक मगर, कौठा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बापूसाहेब शिपलकर, पांडुरंग शिपलकर, उपसरपंच अनिल खरात, दत्तात्रय शिपलकर, हनुमंत सूर्यवंशी, सचिन लोखंडे तसेच गार ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…
