दिनांक २७ जानेवारी, श्रीगोंदा:
शहरातील होळीगल्ली येथे फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, राष्ट्रीय ऐक्य परिषदच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिनांक २६ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. नमूद कार्यक्रमाचे अध्यक्ष (सामाजिक कार्यकर्ते) संतोष इथापे हे होते. तर, मुख्य वक्ते श्रीकृष्ण मोरे (दौंड) हे होते. मुकुंद सोनटक्के यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तर, Ad खामगळ यांनी सूत्रसंचालन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना संतोष इथापे म्हणाले की, महापुरुषांचे विचार तळागाळातील सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सण साजरी होत असतांना, राष्ट्रीय प्रतीकांची माहिती सामान्यानां मिळाली पाहिजे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन यासारखे दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे करण्यात यावेत. महामानवांच्या विचारांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकत, भारतीय संविधान हे जगातील एकमेव हस्तलिखित संविधान असून, सर्वसामान्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय बहाल करणारे हे एक महान पुस्तक असल्याचे त्यांनी येथे नमूद केले. संविधानातील कलमांचे अध्ययन होणे आज काळाची गरज असून, याबाबत व्याख्यान आणि प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. असेही अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले.
मुख्य वक्ता श्रीकृष्ण मोरे यांनी संबंध मानवजातीच्या कल्याणाचे विषय यावेळी हाताळले. संत परंपरेपासून महामानवांच्या विचारापर्यंत त्यांनी सर्व महापुरुषां, महामातांच्या वैचारिक भूमिकेचा उल्लेख या ठिकाणी उपस्थितांसमोर केला. समाज कल्याणासाठी झटणाऱ्या सर्वांचा उल्लेख करीत, राष्ट्रीय प्रतीकं तसेच, भारतीय संविधानाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती विशद केली. या ठिकाणी त्यांनी मानवी मूल्यांचा सह, सामाज हिताचे प्रश्न हाताळले, ऐतिहासिक दाखले देत त्यांनी महावीर – बुद्धापासून ते सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज ते अण्णाभाऊ साठेंपर्यंत सर्वांच्या जीवन कार्यांचा संघर्ष यावेळी आपल्या मुख्य भाषणातून मांडला.
मुकुंद सोनटक्के यांनीही महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत आपल्या भाषणातून उल्लेख केला. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या जगविख्यात घटनेच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचा आणि कलमांचा उल्लेख करीत, सामान्यांना तारणारे सविधान हे एकमेव पुस्तक असल्याचे त्यांनी नमूद केले. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीवर जाण्यासाठी झलेल्या त्रासापासून त्यांनी केलेल्या मसुदा समितीतील उल्लेखनीय कामगिरीसह देशाला अर्पण केलेल्या संविधानाबाबत सविस्तर माहिती मांडली.

या प्रसंगी Ad संभाजीराव बोरुडे, बापू माने, हभप शिंदे महाराज, Ad महेंद्र शिंदे, (संभाजी ब्रिगेडचे) नानासाहेब शिंदे, अरविंद कापसे, मच्छिंद्र काका सुपेकर, सौ. गयाबाई सुपेकर, सौ. मनीषा चंदन घोडके, प्रा. रेश्मा घोडके, Ad लोणकर, नगरसेवक प्रशांत गोरे, विनोद उजगरे, Ad सुरुचीताई लोणकर, राजेंद्र औटी, इरफान शेख, संतोष बोळगे, काका कदम, पत्रकार शकीलभाई शेख, पत्रकार रमेश गांधी, सहकार बँकेतील अधिकारी ससाने साहेब, भाको साळवे गुरुजी (राशीन), प्रशांत चव्हाण सर, सतिश ओहोळ सर, कोथिंबिरे, मेहेर पेंटर, मनोज मैड, वसीम शेख, भीमा कोथिंबिरे सह होळी गल्ली परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
