दिनांक १ जुन २०२६, श्रीगोंदा:
येथील तहसील कार्यालय परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कार्यालयाच्या कचराकुंडीत संभाजी ब्रिगेड या संघटनेचा, महापुरुषांच्या प्रतिमा असलेला एक बॅनर धुळखात आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेला पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तहसील कार्यालय परिसरात असलेल्या कचराकुंडीत महापुरुषांचे फोटो असलेला संभाजी ब्रिगेडचा बॅनर अत्यंत दुरवस्थेत फेकून देण्यात आला आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारातच महापुरुषांचा अशा प्रकारे अवमान होत असल्याने प्रशासनाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ज्या महापुरुषांनी समाजाला दिशा दिली, त्यांच्या प्रतिमा अशा प्रकारे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेल्या पाहून स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाला महापुरुषांबद्दल आदर नाही का?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
हा बॅनर कचराकुंडीत कोणी आणि का टाकला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा प्रकार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यास तालुक्यात आंदोलन उभे राहण्याची आणि वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता या गंभीर प्रकारावर तहसील प्रशासन काय कारवाई करणार आणि दोषींवर गुन्हे दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या कचराकुंडीत महापुरुषांच्या प्रतिमा असलेला बॅनर; संभाजी ब्रिगेड आक्रमक होण्याची शक्यता..
















Leave a Reply