मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण; संभाजी ब्रिगेड पक्षाचे निषेध आंदोलन..

श्रीगोंदा, दि. २९ ऑगस्ट २०२५ –

श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता, मंडईसाठी जागा, पार्किंग व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे स्पीडब्रेकर, भटकी जनावरे, अतिक्रमण, सीसीटीव्ही कॅमेरे आदी गंभीर समस्यांबाबत दोन वेळा निवेदन देऊनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेड पक्षाकडून नगरपरिषदेत तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी भगत मॅडम यांनी दालन सोडल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास आंदोलन सुरू ठेवले. चर्चेसाठी मुख्याधिकारींनी कार्यकर्त्यांना बोलावले असता “चर्चा लाईव्ह करा” या मागणीवरून त्यांनी चर्चा टाळली.

या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारींच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त केला. तसेच कामचुकार मुख्याधिकारींना प्रशासक पदावरून हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी दिला.

या आंदोलनात मुख्य सचिव सुयोग धस, उपाध्यक्ष दिलीप लबडे, प्रफुल्ल (बापू) जगताप, संदिप जगताप, रवींद्र महंदुळे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष घनश्याम काळे, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सद्दाम शेख, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष उत्तम घोगरे, उपाध्यक्ष पांडुरंग खोरे, कृष्णा जगताप, युवक आघाडी उपाध्यक्ष प्रतीक साळवे यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading