“गाव तिथे नेता, गाव तिथे शाखा” – श्रीगोंदा काँग्रेसची निवडणूक तयारी जोरात; प्रशांत ओगले यांचे कार्यकर्त्यांना आदेश..

श्रीगोंदा, २९ ऑगस्ट २०२५:

आगामी काळात होणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत, सोसायटी, नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका प्रचंड ताकदीने लढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस तसेच समविचारी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश देत सांगितले की, “गाव तिथे नेता, गाव तिथे शाखा” या ब्रीदवाक्याखाली पक्ष संघटन मजबूत करा आणि निवडणुका जिंकण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी कामाला लागा.

बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी “टायगर अभी जिंदा है” या संदेशासह एकजुटीने निवडणुका लढवण्याचा निर्धार केला. ओगले यांनी सांगितले की, मतचोरी रोखण्यासाठी काँग्रेस ब्रिगेडची स्थापना करण्यात आली असून ते प्रत्येक बुथवर लक्ष ठेवतील. पक्षाच्या ध्येय-धोरणांची जनतेत पोहोच वाढवण्यासाठी गावागावांत शाखा उभारण्याचे आदेश देण्यात आले.

प्रशांत ओगले म्हणाले, “लोकांना वाटते काँग्रेस पक्ष संपुष्टात येतो आहे, पण आपण सगळे मिळून त्यांना दाखवून देऊ की काँग्रेस पक्ष आजही जिवंत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरूनही आपण निवडणुका जिंकू.” या बैठकीस तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात ज्येष्ठ नेते सावता हिरवे, ऍड. समित बोरुडे, तालुका अध्यक्ष विकास काळे, शहराध्यक्ष मुजफ्फर शेख, वामन भदे, संतोष भोईटे (सांगवी दुमाला), महेश दरेकर (सरपंच वडाळी), उपसरपंच राम घोडके, शहाजी पाटील (चेअरमन पेडगाव सोसायटी), डॉ. गोरख बायकर, सुभान तांबोळी, सचिन गायकवाड, कांतीलाल कोकाटे (ओबीसी सेल अध्यक्ष), प्रशांत सिदनकर (जिल्हा उपाध्यक्ष), निशांत लोखंडे, संदीप वागस्कर, लाला बारगुजे, पवन मोहिते, गोवर्धन कारले पाटील, गणेश आधूरे, आकाश लबडे, प्रवीण ढगे, अमोल भोसले, राजू रसाळ, सचिन चोर, सुरज शेख, योगेश शेळके, नितीन खेडकर, स्वप्निल निंभोरे, सोमा कारळे, गणेश बारगुजे यांसह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.


📌 मुख्य मुद्दे:

  • सर्वच निवडणुका प्रचंड ताकदीने लढवण्याचा निर्धार.
  • “गाव तिथे नेता, गाव तिथे शाखा” मोहिमेद्वारे संघटन मजबूत करण्याचा निर्णय.
  • मतचोरी रोखण्यासाठी बुथनिहाय काँग्रेस ब्रिगेड तैनात.
  • प्रशांत ओगले यांचे कार्यकर्त्यांना आदेश: “कामाला लागा, टायगर अभी जिंदा है!”
  • तालुक्यातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

स्रोत:(बैठक)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading