श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले! शेख महंमद बाबा दर्गाहवरील चादर प्रकरणामुळे अधिकाऱ्यांना खडेबोल..!

दिनांक २९ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील श्री संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार शेतकरी मेळाव्यापूर्वी दर्शनासाठी आले असता अनपेक्षित प्रकार घडला. अजित पवार यांनी शेख महंमद बाबांच्या समाधीवर आदरपूर्वक चादर अर्पण केली होती. परंतु त्यांच्या समोरच घनश्याम शेलार यांचे समर्थकांनी ती अर्पण केलेली चादर काढून टाकली.

या घटनेमुळे उपमुख्यमंत्री संतापले. “माझ्या समोर असे प्रकार होत असतील, तर मागे काय होत असेल?” असा संतप्त सवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित केला. तसेच, “चादर काढणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहून घ्या” असे निर्देशही दिले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची चौकशी सुरू आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

advertise ..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading