श्रीगोंदा.. नगराध्यक्ष पदासाठी घनश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा; विकसनशील शहरासाठी जनतेचा आग्रह.!

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या विकासाची सध्याची अवस्था पाहता, दूरदृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या एका सक्षम नेतृत्वाची गरज तीव्रतेने जाणवत आहे. शहरातील रखडलेली कामे, खड्डे, प्रदूषण आणि भ्रष्ट कारभारामुळे जनतेचा संयम आता तुटला असून, यामुळेच श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून घनश्याम शेलार यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.

शेलार यांनी निवडणूक लढवल्यास, शहरवासीयांना न्याय मिळेल, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर, राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. “लोकसभा-विधानसभेत ज्यांचा विचार व्हायला हवा, ते आता नगराध्यक्षपदासाठी उतरणार का?” असे प्रश्न उपस्थित होत असले तरी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र या चर्चेने उत्साह संचारला आहे.

शहरात ४० ते ४५ वर्षांपासून राहणारे, समाजकारण आणि राजकारणाचा सखोल अनुभव असलेले घनश्याम शेलार यांनी अनेकदा जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. नागरिकांमध्ये असा विश्वास आहे की, हा माणूस काहीतरी सकारात्मक घडवेल आणि शहर किमान बारामतीच्या विकासमार्गावर पुढे जाईल.

शेलार यांच्यात प्रशासनावर वचक ठेवणे, नगरपालिका निधीचा योग्य वापर करणे आणि सर्वसमावेशक नेतृत्व करण्याचे गुण असल्याची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासात अमुलाग्र बदल घडून येतील, अशी अपेक्षा आहे.

घनश्याम अण्णा शेलार यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी असलेले संबंध शहराच्या विकासासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतात, अशी महत्त्वपूर्ण भावना सामान्य नागरिकांमध्ये आहे. या संबंधाचा फायदा घेऊन ते शहराला विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

शहरातील रस्त्यांची दुरावस्था तातडीने सुधारणे… शहराचे प्रदूषण कमी करून आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे.. प्रशासकीय लूट थांबवून जन कल्याणाच्या योजना राबवणे… रखडलेली विकास कामे पूर्ण करून शहराला एका परिपक्व नेतृत्वाची दिशा देणे. हे शहरातील अपेक्षित महत्त्वाचे प्रश्न आहेत..

श्रीगोंद्याला विकासाच्या नावाखाली भकास करणाऱ्या ‘वजनदार’ पदाधिकाऱ्यांविरोधात ही एक चांगलीच ‘चपराग’ ठरू शकते. शहरातील सामान्य जनतेचा संयम आता संपला असून, घनश्याम शेलार यांनी नगराध्यक्षपदी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, तो शहरवासीयांसाठी खूप मोठी आनंदाची आणि न्यायाची बाब ठरेल.

सामान्य जनतेतून शेलार यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असून, विकसनशील शहराचा दृष्टिकोन असणारा नेता म्हणून ते पुढे येतील का, याकडे संपूर्ण श्रीगोंदा शहराचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(श्रीगोंदा शहरातील सामान्य नागरिकांची चर्चा आणि अपेक्षेनुसार).

Leave a Reply