श्रीगोंदा नगराध्यक्ष पदासाठी ‘धनशक्ती विरुद्ध निष्ठा’ संघर्ष..? ४ दशके भाजपची निस्वार्थ सेवा करणारे दत्तात्रय हिरणावळे यांची उमेदवारीसाठी मागणी.!

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच! नगराध्यक्ष पदासाठी ‘धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य’ संघर्ष पेटणार?

दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढली असून, खुला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित असल्याने अनेक जुने-नवे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत.

मात्र, या सत्ताकारण-अर्थकारणाच्या वर्तुळात सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील एक चेहरा चर्चेत आला आहे. शक्तिशाली आणि आर्थिकदृष्ट्या धनदांडग्या लोकांमध्ये पक्षाशी व संघटनेशी प्रामाणिक असलेले दत्तात्रय हिरणावळे यांचे सामाजिक योगदान आणि नगराध्यक्ष पदासाठीची त्यांची योग्यता यामुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना दत्तात्रय हिरणावळे यांनी माध्यमांना सांगितले की, “नगराध्यक्ष पद जर जनतेतून असेल, तर पक्षाने जनतेची प्रतिक्रिया घ्यावी अशी माझी विनंती आहे.” तसेच, “ज्येष्ठ असल्याने संघटनेने माझा विचार करावा,” असेही ते म्हणाले. दोन वेळेस स्वतः नगरसेवक आणि एकदा पत्नी नगरसेविका झाल्यामुळे जनकल्याणाच्या योजनांचा चांगला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

चार दशकांची निस्वार्थ सेवा आणि श्रीगोंदा शहराचे वाळवंट’ करणारी काही राजकारणी..

दत्तात्रय हिरणावळे यांनी १९८१ साली वयाच्या १८ व्या वर्षी कैलासवासी ॲडवोकेट राजाभाऊ झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त सहा लोकांना सोबत घेऊन भाजप पक्षाची श्रीगोंदा तालुक्यात स्थापना केल्याची माहिती दिली.

“अनेकांनी पक्ष आणि संघटनेचा वापर करून स्वतःच्या मोठे होण्यासाठी प्रयत्न केला, मात्र मी मागील चार दशकांपासून कोणी आले-कोणी दिले याचा विचार न करता पक्ष आणि संघटना बळकटीसाठी प्रयत्न केले,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यात पहिल्यांदा भाजपचे चिन्ह निवडून आल्याचा मोठा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य’ – सर्व्हे करून उमेदवारी द्या.!

श्रीगोंदा शहरातील सध्याच्या स्थितीवर बोट ठेवत हिरणावळे यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आत्ताची निवडणूक ही धनदांडगे विरुद्ध सर्वसामान्य अशी असणार आहे, कारण धनशक्तीतून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आले आहे.

यामुळे श्रीगोंदा शहराची दुर्दशा झाली असून, सर्वत्र उकिरडे, खड्डे, धूळ, आजार याने नागरिक त्रस्त आहेत.” शहराचे वाळवंट करणाऱ्या राजकारणासाठी माझ्याकडे दूरदृष्टी आहे, शहराचा विकास करण्याची कुवत आणि मानसिकता माझ्या संघटनेत आहे. त्यामुळे पक्षाने सर्व्हे करावा आणि सर्वसामान्यांची जाण असलेला, सर्वसमावेशक व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून द्यावा, अशी मागणी हिरणावळे यांनी केली आहे.

“माझ्या प्रामाणिकपणाचं कधीतरी उत्तर मला मिळणार आहे का?” असा भावनिक सवालही त्यांनी पक्षाला केला आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती आणि स्थानिक लोकांच्या चर्चे नुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading