श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीची तालुका कार्यकारणी जाहीर; तरुणांचा मोठ्या संख्येने प्रवेश..

दिनांक ८ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुका कार्यकारणी, तालुका पदाधिकारी बैठक आणि विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रम आज श्रीगोंदा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीचा video..

या कार्यक्रमास जिल्हा व तालुका पातळीवरील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत, महिला जिल्हाध्यक्षा राजेश्री ताई शिंदे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज यांनी भूषविले.

या वेळी शामभाऊ जरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून ते आजच्या कार्यपद्धतीपर्यंतचा इतिहास मांडला. त्यांनी बुद्ध, संत नामदेव, मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, छत्रपती शाहू महाराजांचे आरक्षण, महात्मा फुले, टिळकांचा गणेशोत्सव, हडप्पा संस्कृती, मातृसत्ताक पद्धती आदी ऐतिहासिक घटना व महापुरुषांची योगदान स्पष्ट केले. तसेच सध्याच्या सांप्रदायिक राजकारणावर त्यांनी टीका करत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसह समाजप्रबोधनाची दिशा स्वीकारावी असे आवाहन केले.

दिलीप लबडे यांनी आपले विचार व्यक्त करताना, “संभाजी ब्रिगेडमुळे माझ्या जीवनात जातिवाद संपला आणि माझ्यातला माणूस जागा झाला” असे सांगत विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारसरणीवर चालण्याचे आवाहन केले.

या वेळी विद्यार्थी आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली –

  • तालुकाध्यक्ष : तुषार जगधने
  • उपाध्यक्ष : आदर्श पवार
  • सचिव : जीवन ससाणे

कार्यक्रमात सुयोग धस यांनी आभार मानले. तरुणांनी समाजव्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष दिलीप लबडे यांनी केले.

या वेळी पक्षाचे सचिव सुयोग धस, उपाध्यक्ष बापू जगताप, संदिप जगताप, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सद्दाम शेख, उद्योजक आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, युवक आघाडी तालुकाध्यक्ष सुहास गाडेकर, संघटक संतोष आरडे मेजर, शेतकरी आघाडी उपाध्यक्ष पांडुरंग खोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आदर्श प्रशांत खराडे, वैष्णव कांबळे, सुरज मोरे, निखिल चिखलठाणे, रोहन ढवान, अभिषेक ढोकळे, तुषार गायकवाड, सत्यम सावंत, अनिकेत साळुंखे, सार्थक नलगे, प्रणव जाधव, ऋषिकेश बिबे, मयूर निकर, संदीप डेबरे, दादा औटी, संदीप हिरडे, साहेब शिंदे, अभिजीत दळवी, ओमकार पवार, सार्थक थोरात यांसारख्या अनेक तरुणांनीही संभाजी ब्रिगेडमध्ये जाहीर प्रवेश केला.

संभाजी ब्रिगेड पक्षाची भूमिका सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारी असून विशेषतः विद्यार्थी व तरुणांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading