श्रीगोंदा शहरात बालमजुरीचा विळखा घट्ट; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

दिनांक २७ मे २०२६ श्रीगोंदा:

तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या श्रीगोंदा शहरात आणि परिसरात मागील काही महिन्यांत बाल मजुरांची संख्या कमालीची वाढली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कायद्याने बालमजुरी गुन्हा असतानाही, शहराच्या मुख्य बाजारपेठेत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.

चहाच्या टपऱ्या, ढाबे आणि हॉटेल्समध्ये भांडी घासणे व टेबल पुसण्यासाठी मुलांचा वापर., कपड्यांची, किराणा दुकाने आणि वाहनांच्या गॅरेजमध्ये अवजड कामे., स्थलांतरित व परप्रांतीय कुटुंबांतील अल्पवयीन मुले पालकांसोबत काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

“शासकीय कार्यालयांच्या हाकेच्या अंतरावर हे सर्व सुरू असताना, कामगार विकास विभाग, पोलीस आणि ‘बालमजुरी विरोधी विशेष पथक’ (Task Force) कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रशासन केवळ ‘बालमजुरी विरोधी दिना’पुरतेच मर्यादित राहिले आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.”

कामगार आयुक्तालय आणि पोलिसांनी व्यावसायिक ठिकाणांवर तातडीने अचानक छापे टाकावेत. बालमजुरी करून घेणाऱ्या मालकांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत.
आढळलेल्या मुलांचे पुनर्वसन करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

“प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाई करणे गरजेचे आहे, तरच या कोवळ्या हातांना पुन्हा पाटी-पेन्सिल मिळेल.”

(स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading