शिरूर तालुक्यात HDFC बँकेत बनावट सोन्यावर लाखोंचा गोल्ड लोन घोटाळा; १२ जणांवर गुन्हा दाखल, दोघे अटकेत..

दिनांक २७ मे २०२६, श्रीगोंदा/शिरूर

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील HDFC बँकेत बनावट सोने गहाण ठेवून बँकेची तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये एकूण १२ आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात बँकेच्या वतीने निलेश शरदराव वाघमारे (वय ३३, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

रांजणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. आरोपींनी संगनमत करून रांजणगाव येथील HDFC बँकेत आणलेले दागिने खरे असल्याचे भासवले. त्यावर बँकेकडून गोल्ड लोन मंजूर करून घेतले आणि बँकेला १७.७६ लाखांचा चुना लावला.

या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार लक्ष्मण उर्फ लक्ष्मण किसन वीर असल्याचे समोर आले आहे. त्याने व इतर आरोपींनी बनावट दागिने बँकेत जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे (१२ आरोपी):
१) लक्ष्मण उर्फ लक्ष्मण किसन वीर (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) – मुख्य आरोपी
२) मच्छिंद्र दिगंबर खेडकर (रा. संकल्प सिटी, रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) – मुख्य आरोपी
३) अशोक दादा मांडगे (रा. रांजणगाव मशिद, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
४) किरण हौसराव कुताळ (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे)
५) अभिषेक मधुकर देशमुख (रा. बाभुळसर, ता. शिरूर, जि. पुणे)
६) उज्वला रावसाहेब लव्हांडे
७) दीपक नाना बोराडे (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे)
८) बाजीराव सिताराम भोसले (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
९) अभिषेक यशवंत आंधळे (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे)
१०) मयुर रंगनाथ तांबे (रा. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे)
११) संजय हिरामण पंडित (रा. हडपसर, सोलापूर रोड, ता. हवेली, जि. पुणे)
१२) प्रवीण गव्हाणे (रा. मांजरी, ता. हवेली, जि. पुणे)
बँकेच्या ‘व्हॅल्युअर’वर गंभीर आरोप करण्यात आले.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, HDFC बँकेकडून नेमण्यात आलेल्या गोल्ड लोन व्हॅल्युअरवर (सोने पारखणारा) फसवणुकीचे थेट आरोप झाले आहेत. आरोपींनी आणलेले खोटे सोने खरे असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्यानेच हा घोटाळा शक्य झाला. त्यामुळे हा केवळ एक साधा फसवणुकीचा प्रकार नसून, बँकेच्या अंतर्गत यंत्रणेच्या संगनमताने केलेला मोठा घोटाळा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लक्ष्मण किसन वीर आणि मच्छिंद्र दिगंबर खेडकर यांना २५ मे २०२६ रोजी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी लक्ष्मण वीर याला २९ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, मच्छिंद्र खेडकर याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बनावट सोने बँकेत गहाण ठेवले जाणे आणि व्हॅल्युअरने त्याला तात्काळ खरे असल्याचे प्रमाणपत्र देणे, यावरून बँकेच्या अंतर्गत कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “सामान्य नागरिकांनी बँकेवर विश्वास कसा ठेवावा?” असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. काही हजारांच्या कमिशनसाठी जर अशा प्रकारे बनावट सोन्याला खरे ठरवले जात असेल, तर बँकेतील ठेवीदारांच्या सुरक्षेचे काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ निकम करत आहेत. या घोटाळ्यात इतर जिल्ह्यांतील काही व्यक्तींचे संबंध असण्याची शक्यता असून, पोलीस त्या दिशेने कसून तपास करत आहेत. इतर आरोपी आणि मुख्य सूत्रधार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading