दिनांक १८ नोव्हेंबर (श्रीगोंदा फॅक्टरी,श्रीगोंदा):
तालुक्यातील श्रीगोंदा फॕक्टरी येथील रहिवासी समीर शेख (वय१५) हा साखर कारखान्यात दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बग्यास विभागात काम करतांना, मशीनच्या बेल्टमध्ये अडकून अपघातग्रस्त झाला. यानंतर पीडितास पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र, दुर्दैवाने उपचारा दरम्यान आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये बाल कामगारांच्या मृत्यूची कामगार आयुक्त दखल घेतील का ? असा सवाल मयत मुलाच्या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहे.
स्रोत:(दत्ता पाचपुते,काष्टी)
