श्रीमती अलका दरेकर यांचा सन्मान सोहळा संपन्न..

दिनांक १७ जुन २०२४,श्रीगोंदा:

डॉ.राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर यांचा सेवानिवृत्तीचा सन्मान सोहळा तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे अध्यक्षस्थानी होते.

श्री नागवडे यांनी आपल्या भाषणात श्रीमती दरेकर यांच्या ३५ वर्षांच्या तळमळीच्या सेवेकडे लक्ष वेधले. “श्रीमती दरेकर यांनी ज्ञानदानाच्या कार्यातून संस्था आणि विद्यालयाची मान उंचावली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा योगदान अविस्मरणीय आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यांनी पुढे सांगितले की, दिवंगत प्रा. तुकाराम दरेकर सरांचा वारसा लाभलेल्या श्रीमती दरेकर यांनी शिस्तबद्ध आणि तळमळीच्या कामामुळे विद्यार्थ्यांना उत्तम घडवले.

आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात सांगितले की, “श्रीमती दरेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेत शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.”

भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी म्हटले की, “श्रीमती दरेकर यांचा ३५ वर्षांचा सेवा कार्यकाल सहज संपणारा नाही. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळेच त्या यशस्वी झाल्या.”

सत्काराला उत्तर देताना श्रीमती दरेकर भावनिक झाल्या आणि म्हणाल्या, “३५ वर्षांच्या सेवेतून मी अनेक उत्तम क्षण अनुभवले आहेत. शिक्षण महर्षी बापू आणि अध्यक्ष नागवडे यांच्या सहकार्यामुळेच मी उत्तम काम करू शकले.”

या कार्यक्रमाला आमदार बबनराव पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, सुभाषराव शिंदे, संदीप नागवडे, सुनील अनभुले, संतोष दरेकर, सुवर्णा पाचपुते, अनिल शिंदे, शिक्षक नेते एम एस लगड, तसेच शिक्षण संस्थांचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विचारमंचावर विचार व्यक्त करतांना अलका दरेकर..

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading