दिनांक ७ जून (निघोज,पारनेर):
तालुक्यातील नामांकित व्यक्तिमत्व व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती संघ मुंबई/निघोज जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून समाज प्रक्रियेमध्ये हिरीरीने सहभागी असणारे DYSP सुभाष रामभाऊ सोनवणे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचे मित्रपरिवार, सहकारी, वरिष्ठ अधिकारी, नातेवाईक व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

पोलीस दलात भरती झाल्यावर सुभाष सोनवणे साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्व व कामगिरीच्या जोरावर एक एक पद पादाक्रांत करीत यशाची घोड दौड पोलीस कॉन्स्टेबल ते कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी अशी ठेवली. कार्यक्षेत्रात कर्तव्यावर असतांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. कनिष्ठ कर्मचारी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत समतोल राखत कार्य पूर्णत्वास नेणे हे त्यांच्या कामाचा विशेष गुण.

पोलीस कॉन्स्टेबल ते एक कर्तव्यदक्ष्य पोलीस अधिकारी हा त्यांचा यशस्वी प्रवास नक्कीच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. सुरवातीच्या कालखंडात घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व सामान्य असतांना सुभाष सोनावणे हे सन १९८८ साली बृहन्मुंबई येथे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. कर्तव्यतत्पर व प्रामाणिक असणाऱ्या सोनवणे यांच्या कामामुळे त्यांची १९९७ साली पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी, मुंबई येथे पदोन्नती झाली. प्रक्रियेत वेगवेगळ्या कामगिरींच्या जोरावर सन २००८ नंतर मुंबई लोहमार्ग आणि पुणे लोहमार्ग येथे पोलीस निरीक्षक (PI) म्हनूण त्यांनी यशस्वी कर्तव्य बजावले. सन २०१२ साली त्यांची पोलीस उपधीक्षक म्हणून पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे बढती झाली. या दरम्यान त्यांनी यशस्वी कर्तव्य बजावले. पुढे सन २०१४ साली पुणे येथील SRPF ग्रुप.१ येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदरी सोपवण्यात आली. सोनवने यांनी मनापासून स्वीकारलेल्या जबाबदारीने SRPF ग्रुप.२ आणि SRPF ग्रुप.१० मध्ये सेवानिवृत्तीपर्यंत उत्कृष्ट सेवा दिली. अत्यत संयमी आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून DYSP सुभाष सोनवणे यांची पोलीस दलामध्ये एक वेगळीच छबी निर्माण आहे.
त्यांच्या कार्य काळामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक सहकारी, कनिष्ठ/वरिष्ठ कर्मचारी/अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर पाणावलेल्या डोळ्याने त्यांना निरोप दिला असून, अभिनंदन केले आहे. police- constable- to-dutiful- police- officer- dysp- subhash-sonawane
तत्कालीन कौटुंबिक परिस्थितीशी झुंज देत असतांना सुरुवातीच्या कालखंडात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत प्रशासकीय पद मिळवून, कॉन्स्टेबल ते डीवायएसपी पर्यंतचा खरतड कार्यप्रवास पादांक्रांत करतांना, येणाऱ्या अडचणींवर मात करून, मार्गक्रमण करणाऱ्या सुभाष सोनवणे सरांच्या कार्यकिर्दीतील कामगिरी व कार्य-कर्तृत्व समाजातील अनेक तरुणांना व आपले भवितव्य पोलीस प्रशासनात करू पाहणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारे ठरणार आहे. सामान्य व्यक्ती असामान्य होते. ते त्याच्या कर्तुत्वावर याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डी. वाय. एस. पी. सुभाष सोनवणे (सर) होय.
स्रोत:(मनोज रणदिवे, राजापूर, श्रीगोंदा)
