श्रीगोंदा शहरात बनावट नोटा बनवणारे रॅकेट पकडले.

दिनांक २८ फेब्रुवारी श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात हजार ५०० व १०० रुपयांच्या बनावट नोटा छापून वितरित करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमालासहित आरोपींना रंगेहाथ पकडले.
विजय दादासाहेब वाळुंज व अक्षय गोळे या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी पोलीस हवालदार दादासाहेब टाके यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करून अटक केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा- दौंड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या बसस्थानकासमोर सकाळी ११ च्या सुमारास दोन संशयित तरुण थांबले असून त्यांच्याकडे २ हजार,५००,२०००,व १०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याची गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून आरोपी हस्तगत केले.
या कारवाईत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष गावित यांनी फौज फाट्यासह सापळा रचून तेथे उभ्या असलेल्या विजय दादासाहेब वाळुंज रा. टाकळी कडेवळीत व अक्षय गोळे रा.काष्टी यांना ताब्यात घेऊन यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या कडे २ हजार रुपयांच्या २ नोटा, ५०० रुपयांच्या १३ व १०० रुपयांच्या ८ अश्या सुमारे ११ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात भारतीय चलनाच्या नोटा बनावट नोटा बनवून जवळ ठेवणे व वितरित करणे या नुसार भा. द. वि कलम ४८९ अ. ब.क.ड. नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपीस अटक करण्यात आले.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष गावीत,किरण भापकर हे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply