शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रेरना,मनोबल व उत्साह वाढवन्यासाठी आम्ही पाठीशी आहोत.पत्रकार शकील भाई शेख ..

दिनांक २८ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
जि.प.उर्दू शाळेतील विद्यर्थि विद्यार्थिनी अभ्यासाबरोबरच केन्द्रस्तरीय विविध स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवतात ही निश्चितच अभिमा- नाची गोष्ट आहे.याबद्दल त्यांच्यासाठी कौतुका चे दोन शब्द व पाठीवर शाबासकीची थाप द्यायलाच हवी. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते.
शाळेची गुणवत्ता व विविध स्पर्धानचे यश दिवसेंदिवस वाढत जावो व त्यानिमित्ताने त्यांचे कौतुक व सहकार्य करण्यासाठी आमचे हाथ व साथ सदैव सोबत असतील शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रेरना,मनोबल व उत्साह वाढवन्यासाठी आम्ही पाठीशी आहोत.अशा सदिच्छा पत्रकारसंघाचे अध्यक्ष शकिलभाई शेख यांनी व्यक्त केल्या.
केन्द्रस्तरीय खो खो क्रीड़ास्पर्धेत उर्दू शाळेतील विद्यार्थिनिनी प्रथम क्रमांक मिलवल्याबद्दल प्रशस्तिपत्र वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्रमुख पाहुणे म्हणून शेख बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मो शमीम कादरी होते.मुले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नगीना शेख ,वसीम ताड़े ,अनिल तिखे, साचे आदिंसह शिक्षक,पालक उपस्थित होते.केन्द्रस्तरीय खो खो स्पर्धा मुली या स्पर्धेत महेक बेपारी ,शाईन खान ,रुबीना सैय्यद, जैबा खान ,तंजील शेख ,इकरा मोमीन व महेक शेख या विद्यार्थीनींनी यश मिळवल्या बद्दल त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
शकिलभाई शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शालेतील विद्यार्थ्यांना फळे ,मिठाईचे वाटप करण्यात आले व हा आनंदोत्सव एकत्रित साजरा करण्यात आला.यावेळी जनाब मोमिन यांनी तालुक्यातील ही उर्दू शाळा डिजिटल,गुनवत्ता यादित व अग्रेसर असल्याचे सांगत,शकिलभाई हे चार वर्षापासून आपला वाढदिवस शालेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून,आम्हाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading