दिनांक २७ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा/रांजणगाव:
रांजणगाव MIDC पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. मौजे बाभुळसर खुर्द येथील सृष्टी सोसायटीतील एका रो हाऊसवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे ७ लाख रुपये किमतीचा २८ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.

या प्रकरणी मूळचे देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथील असणाऱ्या सौ. दिव्या अतुल गिरे (वय २७) आणि सुरज दिलीप शिंदे (वय २८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा तिसरा साथीदार आणि दिव्या गिरेचा पती, अतुल वसंत गिरे हा मात्र फरार झाला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.

पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली. फरार आरोपी अतुल गिरे याला अटक करून गांजाचा स्रोत आणि विक्रीचे जाळे उघडकीस आणण्याचे पुढील तपास कार्य रांजणगाव MIDC पोलीस करत आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)


Advertise…
