माजी सरपंच देविदास काका राजेशिर्के यांचे दुःखद निधन..

दिनांक २७ सप्टेंबर २०२५,अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव, किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील महाराणी येसुबाई साहेब तथा श्रीमंत राजेशिर्के घराण्याचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच पैलवान देविदास (काका) गणपतराव राजे शिर्के (वय ४४) यांचे सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एक समाजसेवी आणि राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

काका राजेशिर्के यांनी कमी वयातच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियता दाखवली. त्यांनी किल्ले धर्मवीरगड संवर्धन कार्यासह मंदिरांचे बांधकाम आणि धार्मिक-सामाजिक कार्यांसाठी नेहमीच योगदान दिले.

तसेच, गरजू लोकांना आर्थिक मदत करण्यात ते अग्रस्थानी असत. पैलवानकी आणि क्रिकेटमध्येही त्यांनी नावलौकिक मिळवला होता. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी विरोधकांच्याही मनात स्थान निर्माण केले होते.

राष्ट्रवादीचे प्रदेश नेते दिपकराजे शिर्के, पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के आणि सतिश राजेशिर्के यांचे ते धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा यशराज राजेशिर्के तसेच मोठा राजेशिर्के परिवार आहे.

त्यांच्यावर दशक्रिया विधी बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भीमा नदीच्या तीरावर होणार आहे. या निमित्ताने ह.भ.प. विजयाताई पंडित यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading