दिनांक ५ मार्च २०२५, श्रीगोंदा/निफाड:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे वडील कै. बाजीराव एकनाथ शिंदे यांचे दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
त्यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता गोदावरी तीरी नांदूर मध्यमेश्वर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे संपन्न होणार आहे. या विधीसाठी प्रवचनकार ह. भ. प. गोरख महाराज कुदळ ठाणगांवकर यांचे प्रवचनही सकाळी ८:३० वाजता होणार आहे.
कै. बाजीराव शिंदे यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक, पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार बांधवांनी शोक व्यक्त केला आहे. श्रीगोंदा तालुका पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधव शिंदे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. कैलासवासी बाजीराव एकनाथ शिंदे यांना भावपूर्ण आदरांजली.
स्रोत:(निधन वार्ता)




Advertise..
