दिनांक ५ मार्च २०२५,मुंबई:
‘छावा‘ हिंदी चित्रपटात श्रीमंत गणोजीराजे आणि कान्होजीराजे शिर्के यांना खलनायक म्हणून दाखवल्याने राजेशिर्के घराण्याने सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार केली होती. या प्रकरणावर ५ मार्च रोजी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि सीईओ यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.
राजेशिर्के वंशजांनी ऐतिहासिक पुराव्यांसह उपस्थित राहून चित्रपटातील चुकीच्या बाबींबाबत आक्षेप नोंदवला. सेन्सॉर बोर्डाने चूक मान्य करत संबंधित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. याप्रकरणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनाही तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
या बैठकीस दिपकराजे शिर्के, लक्ष्मीकांत राजे शिर्के, भूषणराजे शिर्के यांच्यासह अनेक शिव-शंभू भक्त आणि मराठा बांधव उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




Advertise..
