सामाजिक व पत्रकारिता पुरस्काराने दत्ताजी गेेणबा जगताप सन्मानित.

दिनांक १६ जानेवारी २०२४,श्रीगोंदा:

(प्रतिनिधी-आदेश उबाळे)

श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील साईसेवा बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान संचलित हंगेश्वर पब्लिक स्कूल व के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण २०२३ पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात साईभूषण सामाजिक व पत्रकारिता पुरस्काराने दत्ताजी गेंणबा जगताप यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बाबासाहेब सौदागर (सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, पटकथा संवाद लेखन, चरित्र अभिनेते), मनोहर नाना वीर (मा. शिक्षणाधिकारी), अजिंक्य नामदेव झेंडे (संस्थापक अध्यक्ष, रामेश्वर शिक्षण संस्था चिखली), रघुनाथ गंगाराम शिंदे (पोलीस उपअधीक्षक पो.प्र. केंद्र नानविज) यांच्या हस्ते सत्कारमूर्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम चिंभळे, हंगेवाडी, येळपणे आणि पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित संपन्न झाला.

साई भूषण पुरस्कार सत्कारमूर्ती…

स्व. विठ्ठलराव बापूराव गुंड (सहकार मरणोत्तर), श्री. जब्बार इनामदार (कृषी), श्री. दत्ताजी गेंणबा जगताप (सामाजिक व पत्रकारिता), कु. कामिनी पंढरीनाथ देवीकर (हिरकणी २०२३ पुरस्कार)..

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading