स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या ९० व्या जयंती समारंभा करीता नामदार अजितदादा पवार सभेस संबोधित करणारं..

दिनांक १८ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांचा ९० वा जयंती सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील हायस्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या ९० व्या जयंती समारंभा करीता नामदार अजितदादा पवार यांनी सुरुवातीस सकाळी ११:०० वाजताची वेळ दिली होती. परंतु, त्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सोलापूर येथे सकाळी सभा असल्यामुळे व त्या कार्यक्रमास अजित दादा पवार यांना उपस्थित राहणे अगत्याचे असल्यामुळे नमूद कार्यक्रमाच्या वेळेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे.

राजेंद्र दादा नागवडे यांनी सांगितले की, बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या निवासस्थानी समक्ष चर्चा झाली. त्यानुसार शुक्रवार दिनांक १९ रोजी दुपारी २:०० वाजता नामदार अजित दादा पवार यांचे कारखाना कार्यस्थळावर हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. स्व. बापूंच्या स्मृतीस्थळी जावून ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदिरा गांधी विद्यानिकेतन हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित सभेस संबोधित करण्याकरिता उपस्थित होतील.

तरी सदर कार्यक्रमास सभासद, शेतकरी व ग्रामस्थ बंधु – भगीणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, युवक नेते दीपक शेठ नागवडे यांनी केले आहे.

राजेंद्र दादा नागवडे यांनी नामदार अजित दादा पवार यांचेकडे कुकडी डाव्या कालव्याच्या चालू आवर्तनातून विसापूर धरणात पाणी सोडण्यासाठी निवेदन देऊन आग्रही मागणी केली व त्यानुसार त्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading