विधानसभा निवडणुकीत सौ. अनुराधा नागवडे यांची उमेदवारीची घोषणा, समर्थकांचा जोरदार प्रतिसाद..

अनुराधा नागवडे एकटी आमदार होणार नसून, तालुक्यातील सर्व सामान्य जनता आमदार होणार आहे.: सौ. अनुराधा नागवडे..

दिनांक २० ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:

स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या समाजकारण व राजकारणातील संघर्षमय जीवनाचे स्मरण करत, त्यांच्या वारसा पुढे नेण्याचा निर्धार सौ. अनुराधा नागवडे यांनी जाहीर केला आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती आणि जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी वांगदरी येथे अंबिका माता मंदिराच्या प्रांगणात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याची घोषणा केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस होते. नागवडे यांनी आपल्या भाषणात राज्य पातळीवरील नेत्यांना मदत केली असून, त्यांच्या उमेदवारीसाठी पती राजेंद्र नागवडे, दिर दीपक नागवडे आणि आदेश नागवडे हे गेले महिनाभर पक्षश्रेष्ठींना भेटत असल्याचे सांगितले. समर्थकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाही राजकीय अडचणी येत असल्याचा उल्लेख करत, त्यांनी संघर्षाची तयारी असल्याचे जाहीर केले.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी आपल्या भाषणात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचे राजीनामे देण्याची घोषणा करून, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमात बाबासाहेब भोस यांनी देखील आपल्या भाषणात उमेदवारीसाठी महिनाभर वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचे सांगितले. ते आजारी असतानाही त्यांनी या प्रयत्नात सहभागी होऊन नागवडे विजयी होतील, असे गणित मांडले. कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारासाठी सज्ज होण्याचे आवाहन करत, महाविकास आघाडीचा निर्णय लवकरच होईल, असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात कारखान्याचे संचालक माऊली हिरवे, प्रणाली पाटील, संदीप पंदरकर, गणेश बेरड, राकेश पाचपुते, राजेंद्र ढवळे, संजय डाके, प्रशांत गोरे, मुकुंद सोनटक्के, बाबा महाराज शेंडे आणि इतर कार्यकर्त्यांनी आपली भाषणे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे यांनी केले. श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

सौ. अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, आणि आगामी निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले.

उपस्थीत जनसमुदाय

स्रोत:(कार्यकर्ता संवाद मेळावा)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading