दिनांक २० ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा :
भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली असून, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सौ. प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सौ. पाचपुते या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी आहेत, आणि त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर श्रीगोंदा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपच्या श्रीगोंदा माऊली कार्यालया समोर महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, मतदारसंघात एक प्रकारची सकारात्मक लाट निर्माण झाली आहे.
सौ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी ही पाचपुते कुटुंबातील पारंपारिक राजकीय वारसा पुढे नेणारी आहे. यापूर्वी बबनराव पाचपुते यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे, आणि त्यांच्या कामाचा ठसा उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावावर उमेदवारी दिल्यामुळे दिसून येत आहे. त्यांच्या उमेदवारीने मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य वाढले आहे.
स्रोत;(अधिकृत माहितीनुसार)





