शिवसेना जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांचा ‘जिजाऊ गौरव पुरस्कार’ देऊन गौरव.. महिला संघटन, पत्रकारिता आणि समाजकार्यातील मोलाचा वाटा; जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षात सन्मान.

आहिल्यानगर (ता. श्रीगोंदा) | दिनांक २० जून २०२५:

जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीराताई शिंदे यांचा ‘जिजाऊ गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

हा मेळावा रविवार, दिनांक १४ जून रोजी आहिल्यानगर येथे संपन्न झाला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ. सीमाताई बोके यांच्या हस्ते मीराताई शिंदे यांना गौरवचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला विजयकुमार ठुबे, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष सुजाता ठुबे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अश्विनी देवके, कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष विभावरी ताकट, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, अशोक कुटे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष भारती इंगवले, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिजाऊ ब्रिगेडचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मीराताई शिंदे यांनी मागील २० वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. अनेक सामान्य नागरिकांना अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून दिला. महिला प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून महिलांचे संघटन, प्रबोधन आणि मार्गदर्शन यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

त्यांच्या कार्यामुळे त्या ‘दबंग लेडी’ म्हणून ओळखल्या जातात. त्या शिवसेना पक्षाच्या कार्यातही प्रभावीपणे योगदान देत असून, एक प्रेरणादायी महिला नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप निर्माण केली आहे.

या कार्याची दखल घेत जिजाऊ ब्रिगेडने ‘जिजाऊ गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर आभारप्रदर्शन राजश्री शितोळे यांनी केले.

जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांना ‘जिजाऊ गौरव पुरस्कार’ प्रदान करताना प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके. शेजारी उपस्थित पदाधिकारी.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading