दिनांक १८ जून,श्रीगोंदा:
दिनांक १६ जून २० रोजी “न्युज १८ इंडिया” या न्युज चॅनेलचे अँकर अमीश देवगन यांनी आरपार या कार्यक्रमात सुफी संत हजरत मैनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या सुफी संताविषयी आदर असणाऱ्या समुदायांमध्ये या वक्तव्यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
देशभरात देवगन यांच्या सह त्यांच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यात येत आहे.सदर घटनेचा जाहिर निषेधा बरोबर, न्युज चॅलन अँकर अमीश देवगन याचेवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणी आज श्रीगोंदा तहसिलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले आहे. निसारभाई बेपारी (नगरसेवक) यांच्या उपस्थित हे निवेदन देण्यात आले. यावेळी आजिमभाई जकाते, अजितभाई शेख, नवाजभाई शेख, शाहरुख कुरेशी, समीर सय्यद, जुबेर खान, इरफानभाई शेख, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने सदाफुले यांनी सदर निवेदन स्वीकारले आहे.
