हॉटेलसाठी ११ लाखांची मागणी; श्रीगोंद्यातील विवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

दिनांक ११ एप्रिल २०२६, श्रीगोंदा:

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून ११ लाख रुपये आणि फर्निचर घेऊन ये, अशी मागणी करत एका ३२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जरीनन (वय ३२, मूळ रा. श्रीगोंदा, सध्या रा. मुकुंदनगर) यांचा विवाह २०१७ मध्ये मुस्लिम रिवाजानुसार मुदस्सर याच्याशी झाला होता. सुरुवातीची काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. पती मुदस्सर हा श्रीगोंदा पंचायत समितीत कार्यरत होता. २०२४ पर्यंत सासरच्यांनी विवाहितेला नीट वागवले; मात्र त्यानंतर हॉटेल व्यवसायासाठी पैशांची मागणी सुरू झाली.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सासरच्या मंडळींनी ११ लाख रुपये आणि फर्निचरची मागणी लावून धरली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने उपाशी ठेवणे आणि सतत शिवीगाळ करणे.., लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी करणे., गंभीर धमक्या देऊन अखेर तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले.

या जाचाला कंटाळून विवाहितेने प्रथम ‘भरोसा सेल’कडे तक्रार केली होती. मात्र, तिथे योग्य तो मार्ग न निघाल्याने पोलिसांनी त्यांना रीतसर कायदेशीर कारवाईसाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.

जरीनन यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुदस्सर (पती), हमीदा (सासू), मोहसीन (दीर), तमन्ना (जाऊ) (सर्व राहणार: श्रीगोंदा), आसमा (नणंद), मुदस्सर, (नंदावा) दोघे राहणार: दौंड, यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. भिंगार कॅम्प पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराच्या कलमान्वये कारवाई सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)..

टीप:(फोटो Ai generated आहे.)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading