श्रीगोंदा येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म यात्रा’ आणि ‘मोफत सामुदायिक विवाह’ सोहळ्याचे आयोजन…

दिनांक ३० एप्रिल २०२६,श्रीगोंदा:

भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्ध धम्म यात्रा उत्सव समिती, सिद्धार्थनगर (ससाणेनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भव्य ‘बौद्ध धम्म यात्रा’ व ‘मोफत सामुदायिक विवाह सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न होणार आहे.

उत्सवाची सुरुवात गुरुवार, ३० एप्रिल रोजी रात्री ११:४५ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध अभिवादन सोहळ्याने होईल.

मुख्य सोहळ्याच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता ध्वजारोहण आणि ९:०० वाजता सामूहिक पूजापाठ होईल. यावेळी कृष्णा ससाणे (चेअरमन) यांच्या वतीने ‘खीरदान’ करण्यात येणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी ६:०० वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सामुदायिक विवाह सोहळ्याची भव्य मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येईल. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर रात्री ८:३० वाजता मुख्य विवाह विधी व धम्म सोहळा पार पडेल.

याप्रसंगी उद्योजक मा. चंद्रकांत बसंत औटी (साई श्रद्धा समूह) यांच्या तर्फे स्नेहभोजन दान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन बौद्ध धम्म यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून, यात ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु. धोंडीबा पर्वती घोडके, मार्गदर्शक रावसाहेब घोडके, शिवा (आप्पा) भानुदास घोडके, (अध्यक्ष), आयु. शशिकांत घोडके (उपाध्यक्ष), आयु. भारत घोडके (कार्याध्यक्ष), (खजिनदार) आयु. जिवाजीराव भानुदास घोडके, (स्वागत अध्यक्ष) आयु. प्रदीप घोडके, (सूत्रसंचालन) आयु. गोरख घोडके, याशिवाय आनंद घोडके (सहखजिनदार), भाऊसाहेब घोडके (शालेय समिती अध्यक्ष), अविनाश घोडके (पत्रकार), अक्षय घोडके (युवा नेते) आणि संजय घोडके (उद्योजक) यांच्यासह समस्त सिद्धार्थनगर परिवार या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

श्रीगोंदा परिसरातील सर्व धम्मप्रेमी जनतेने या मंगलमय सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्रोत:(कार्यक्रम पत्रिका)

AI चा वापर करून फोटो तयार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading