दिनांक ४ मे (मढेवडगांव,श्रीगोंदा):
मढेवडगांव येथील सामाजिक कार्यकर्ते व युवक नेते स्मितल वाबळे यांचा ३ मे रोजी ३२ वा वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
सध्या जगभर चालू असलेल्या कोरोनो महामारीमुळे आपल्या देशात लॉक डाऊन चालू आहे.त्यामुळे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हातावरचे पोट असणाऱ्या व भयंकर अडचणींचा सामना करावा लागत असणाऱ्या कुटुंबांच्या परस्थितीचा विचार करून स्मितल वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने साथ फाउंडेशनच्या माध्यमातून व गावचे सरपंच पती प्रा. फुलसिंग मांडे, नगरसेवक समीर बोरा , सुहास काकडे,अमोल गाढवे ,कपिल नागवडे, उमाकांत राऊत, विक्रांत महाडिक यांच्या हस्ते ३२ कुटुंबांना किराणा साहित्य, मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले .
