प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पोलीस व पत्रकारांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप..

दिनांक २० एप्रिल, श्रीगोंदा:

लोकडाऊनच्या कालखंडात कार्यरत असणाऱ्या पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल कर्मचारी तसेच पत्रकार हे या आपत्तीमध्येही आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. कोरोना साथ प्रादुर्भावात आपले काम करत असताना स्वतःच्या आरोग्यासाठी स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी व पत्रकारांना प्रहार संघटनेने सॅनिटायजर आणि मास्कचे वाटप केले आहे.

यावेळी,श्रीगोंदा(पोलीस स्टेशनच्या)वतीने जाधव, (सहाय्यक निरीक्षक)सानप,गोपनीय विभागाचे (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक) स्यामुयल गायकवाड साहेब तसेच पत्रकार संघाचे सन्मानीय तालुकाध्यक्ष अंकुशजी शिंदे,शिवाजी साळुंके, चंदन घोडके,योगेश चंदन,राजेंद्र राऊत,मुस्ताक पठाण,सह प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे (तालुका अध्यक्ष दिव्यांग संघटना),नितीन रोही (प्रथम शहरध्यक्ष प्रहार संघटना) अजित गायकवाड ,सुरेश गलांडे (उपध्यक्ष,दिव्यांग संघटना),उत्तम धारकर इत्यादी उपस्थित होते. पोलीस व पत्रकारांनी प्रहार संघटनरचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading