दिनांक १३ मार्च २०२६, अहिल्यानगर:

दिनांक १३ मार्च २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गॅस वितरकांना दिल्या.

वितरणात अनियमितता, कृत्रिम टंचाई व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक साठेबाजी टाळावी.

गॅस वितरणासाठी ओटीपी पडताळणी व ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून बुकिंगच्या क्रमाने पारदर्शक पद्धतीने वितरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
स्रोत:(dio)
