दिनांक १४ मार्च २०२६,श्रीगोंदा:
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शासनाने अचानक केलेल्या मोठ्या वाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असून शासनाने तात्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबावर त्याचा आर्थिक परिणाम होणार असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तसेच गॅस सिलेंडर नोंदणीचा कालावधी वाढवल्यानेही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी व तहसीलदार यांना श्रीगोंदा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देऊन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष भोयटे, श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. समित बोरुडे,

युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास काळे, वडळी गावचे सरपंच महेश दरेकर, माजी युवक अध्यक्ष गोरख बायकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धनु भाऊ लगड तसेच सोहेल शेख, जितेंद्र पाटोळे, सुरज शेख, बाबासाहेब नलगे, भाऊ गावडे, योगेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शासनाने तात्काळ दरवाढ मागे न घेतल्यास पुढील काळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
