श्रीगोंदा, १५ नोव्हेंबर २०२५:
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या कार्यक्षम पथकामार्फत सुरू असलेल्या प्रभावी कारवायांना लक्ष्य करत, नुकत्याच डिझेल चोरी प्रकरणात अटक झालेल्या आरोपीच्या समर्थनार्थ आणि श्रीगोंदा पोलिसांविरोधात एका ‘सामाजिक कार्यकर्ता’ असल्याचा आव आणणाऱ्या पदाधिकाऱ्याने वरिष्ठ पोलीस कार्यालयासमोर प्रतिकात्मक उपोषण सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, उपोषणात मांडण्यात आलेले मुद्दे पूर्णपणे विसंगत आणि तथ्यहीन आहेत. ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत, ते निराधार असून, उपोषणकर्त्याकडे त्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
डिझेल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आपल्या ‘मित्राला’ स्थानिक गुन्हे शाखेने पकडले, याचा राग मनात धरून पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप केले जात आहेत.
उपोषणकर्त्या व्यक्तीवर यापूर्वी मारहाण, दहशत, जीव मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार असलेल्या या इसमांकडून पोलिसांवर खोटे आणि बनावट आरोप करून बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे.
पोलीस खात्यातील काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “पोलिसांवर खोटे आरोप करून त्यांचे मानसिक स्वास्थ्य खराब करणे, त्यांना बदनाम करणे आणि आपले हित साधणे चुकीचे आहे.”

पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न आहे. कृत्रिम आणि खोटे आरोप करून काही पत्रकारांना हाताशी धरून बातम्या प्रकाशित करणे आणि जाणीवपूर्वक बदनामी करणे, असे कुटिलकारस्थान सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
वरिष्ठ पोलीस कार्यालयामध्ये आंदोलन लावून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे, तसेच खोट्या बातम्या प्रकाशित करून त्यांची बदनामी केली जात आहे.
पोलीस प्रशासनाने माध्यमांना सांगितले आहे की, लवकरच या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचा संपूर्ण लेखा-जोखा (रेकॉर्ड) तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केला जाईल. या माध्यमातून खोटे आरोप करून पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांवर लवकरच कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बनावट आंदोलनामुळे श्रीगोंदा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून, या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
