दिनांक १६ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील नामांकित व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारे डॉ. सागर कोथिंबीरे हे श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रभाग ११ मधून उमेदवारी करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडियावर) घेण्यात आलेल्या एका एक्झिट पोलमध्ये डॉ. सागर कोथिंबीरे यांना सर्वात जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. या पोलमध्ये त्यांना ‘एक क्रमांकाचे मत’ मिळाल्याचे समोर आले असून, हे सर्वसामान्य जनतेच्या त्यांच्यावरील विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.

डॉ. सागर कोथिंबीरे यांनी सामाजिक माध्यमांसह प्रभागातील विविध कामांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. श्रीगोंदा नगरपालिकेतील अनेक प्रश्नांवर त्यांनी आजपर्यंत आवाज उठवला आहे.

श्रीगोंदा शहरातून साळवनदेवी रोडकडे जाणाऱ्या एसटी स्टँड परिसरातील दुर्गंधीचा विषय असो, फुटपाथवरील वृक्षारोपण आणि रस्त्यांचा प्रश्न असो, पथदिव्यां संदर्भातील समस्या असो… यांसारख्या सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत सुविधां संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. सागर कोथिंबीरे यांनी अनेकदा श्रीगोंदा नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे, तसेच वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्राही घेतला आहे.
त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळेच त्यांना या एक्झिट पोलसह सर्वसामान्य जनतेचा सकारात्मक कौल असल्याचे परिसरात बोलले जात आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

