न्याय मेला.? श्रीगोंद्यात महिलेला खोलीत कोंडून ४ तास वायररूफने मारहाण, गुप्तांगावरही जखमा; वरिष्ठ नेता आणि कटनेत्यामुळे गुन्हा दाखल करण्यास मज्जाव.! महिलेला ॲट्रॉसिटीऐवजी ‘दरोड्या’ची धमकी.!

दिनांक १८ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:

तालुक्यातील उत्तरेकडील एका गावात अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शेतात खुरपण्याचे काम करणाऱ्या एका मागासवर्गीय महिलेला किरकोळ कारणावरून निर्घृण मारहाण करण्यात आली असून, तिला एका खोलीत कोंडून चार तास वायररूफने जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे.

तालुक्यातील एका गावात शेतात खुरपण्याचे काम सुरू असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून महिलेला पळू पळू मारहाण करण्यात आली. तिला एका खोलीत बंद करून वायररूफने क्रूरपणे मारहाण करण्यात आली.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गुप्तांगावर, वज्रंगावर (छातीवर) आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीचे गंभीर व्रण होते.

या घटनेनंतर पीडित महिला न्यायाच्या अपेक्षेने सलग चार दिवस श्रीगोंदा पोलीस स्टेशनला चकरा मारत होती. मात्र, तिचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. यामागे तालुक्यातील एका वयस्कर नेत्याने आणि एका कटनेत्याने गुन्हा दाखल करण्यास मज्जाव केल्याचे उघड झाले आहे.

नेत्यांनी मारहाण करणारे नराधम त्यांचे जवळचे पाहुणे आणि मतदारसंघातील लोक असल्याने त्यांना वाचवण्यासाठी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी अन्यायग्रस्त, मागासवर्गीय महिलेला न्याय मागण्यापासून वंचित ठेवले.

स्थानिक मध्यस्थींनी महिलेला उलट समजावले आणि प्रकरण एक लाख रुपयात मिटवण्यात आले. या मध्यस्थीमध्ये श्रीगोंद्यातील एका तोतया पत्रकारासह काही दलाल आणि भडव्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

https://amzn.to/4i3twBv

“जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, तर तुझ्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल,” अशी धमकी देऊन महिलेला जबरदस्तीने प्रकरण मागे घेण्यास भाग पाडण्यात आले.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मध्यस्थींनी मिळालेले पैसेही ढापले आणि महिलेच्या हाती फक्त ५० हजार रुपये देण्यात आले.

कटनेता आणि वरिष्ठ नेता यांनी स्वतःच्या पाहुण्यांची आणि मतदारांची री लावून धरली आणि पीडित महिलेला कचऱ्यात जमा केले, असा थेट आरोप होत आहे. मागासवर्गीय महिलेला झालेल्या या भयंकर अत्याचाराबद्दल आणि नेत्यांच्या भूमिकेबद्दल तालुक्यात संतापाचे वातावरण आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading