कारवाईच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्याकडून आर्थिक लूट..! पेडगाव रोडवरील हॉटेल रजिस्टर तपासणी करत लोकांना धमकी..? बदनामीच्या भीतीने हजारोंची वसुली..?

दिनांक ६ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

शहरालगत असलेल्या पेडगाव रोडवरील एका हॉटेलचा प्रताप श्रीगोंदा वाशियांना काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता.. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांनी हॉटेलात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले होते. आणि याचीच चर्चा सबंध तालुक्यात ऐकण्यात आलती. मात्र, नंतर श्रीगोंदा पोलीसांच्या एका विश्वासू व साहेबांच्या जवळील कर्मचाऱ्याने त्या हॉटेल मधील रजिस्टर तपासणीसाठी आणून त्यात स्वतःचा मोठा फायदा केल्याचे बोलले जात आहे.

नेमके काय आहे हे प्रकरण..?
एक महिन्यांपूर्वी श्रीगोंदा शहरातील पेडगाव रोडवरील त्या हॉटेल वरील काळे कारनामे स्थानिकांच्या मदतीने उजेडात आले होते. येथील लोकांनी स्वयंम स्फुर्तीने केलेली कारवाई तालुक्यात चर्चेचा विषय बनला होता. मात्र, या घटनेनंतर श्रीगोंदा पोलीस अधिकाऱ्याच्या विश्वासू आणि निकट असलेला पोलीस कर्मचाऱ्याने नमुद हॉटेल मधील रजिस्टर तपासणीसाठी पोलीस ठाण्यात आणले.. आणि त्यात नोंद असलेल्या इसमांना फोन करून सदरील हॉटेलवर झालेला प्रकार सांगत.. तुमचे नांव अमुक अमुक हॉटेलच्या रजिस्टर मध्ये असुन, येथील घटना गंभीर असून, तुमच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवून त्या लोकांकडून हजारोंने माया वसूल केली असल्याचे काही पिडीतांकडून समजले आहे.

त्या पोलीस कर्मचाऱ्याची ही कारवाई सर्वत्र गर्जत असुन, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.. तर, पोलीस अधिकाराचा गैरवापर करत काही लोकांना.. किंवा संपुष्टात आलेल्या विषयाची घुसळण करून मलई काढण्यात या पोलीस कर्मचाऱ्याचा हातखंडा असल्याचे दिसून आले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading