लंकेंच्या मिडिया सेल अध्यक्षाकडून विखेंना अश्लील शिवीगाळ.. गोळ्या घालण्याची भाषा..! पदाधिकाऱ्यांच्या फोन संभाषनातून समोरं आला प्रकार..

दिनांक ७ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:

लोकसभा निवडणुक २०२४ ची प्रक्रिया शिगेला पोहचत चालली आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी, समर्थक आपल्या भाषणातून, सभांमधून, मेळाव्यातून, कार्यकर्ता भेटीतून पक्ष, संघटना व उमेदवाराची भुमिका स्पष्ट करण्यात शर्तीचे प्रयत्न करीत असताना, सोज्वळ आणि सकारात्मक भाषा वापरत संविधान दायऱ्यात आपला प्रचार/प्रसार करत आहेत. मात्र, लंकेंचे काही कार्यकर्ता फोनवर बोलताना विखेंच्या बाबत अश्लील आणि गैरसंविधानिक शब्द प्रयोग करतांनाची फोन ऑडियो रेकॉर्डिंग आज समोरं आली आहे.

लंके मीडिया सेलचे अध्यक्ष नाना नामक व्यक्ती पारनेर तालुक्यातील कळस गावचे माजी उप सरपंच काने यांच्या सोबत फोनद्वारे बोलताना विखेनां शिव्या देताना.. त्यांना गोळ्या घालण्याची भाषा करत, नेत्यांविरोधात बोलणाऱ्यानाही ते असंवेदनशील व गलिच्छ बोलतांना ऐकण्यात येतं आहे.

निवडणुका आचारसंहितेदरम्यान आरोप प्रत्यारोपांसोबत पदाधिकाऱ्यांची देहबोली बदलताना आणि त्यांची पायरी ढासळल्याचे या प्रकरणातून समोरं येत आहे.

स्रोत:(ऑडियो क्लिप)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading