श्रीगोंद्यात सोशल डिस्टनसिंगला मूठमाती.कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे तरकारी विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी.

दिनांक २४ एप्रिल श्रीगोंदा:

श्रीगोंदा कार्यक्षेत्रामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत उपाययोजना केल्याचे सर्वश्रूत आहे. तहसीलदार महेंद्र माळी स्वतः जबाबदारीने सर्व प्रक्रिया हाताळत रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.त्यांच्या मार्फत सक्त सूचना देण्यात आल्या असून, कोणत्याही प्रकारे गर्दी करणाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.मात्र,श्रीगोंद्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज सकाळी तरकारी भाजी,फळे विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

सामाजिक आंतर ठेवले तरच,आपण कोरोणाचा प्रादुर्भाव रोखू शकतो.असे असताना भाजी विक्रीच्या नावाखाली मात्र गर्दी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाने यासाठी कठोर पाऊल उचलले असताना लोक मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे हा सगळ्यात महत्वाचा पर्याय असून,काही लोक याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. गर्दी केलेल्या या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

Leave a Reply