कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार पाठीशी – आमदार पाचपुते.

कुकडीच्या पाण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू.

दिनांक २४ एप्रिल,श्रीगोंदा:

सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण अडचणीत आहेत.पण या संकटसमयी केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे.असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाचपुते म्हणाले, सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर असून,सर्वांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या काळात गोरगरीब गावोगावच्या नागरिकांना भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठलीही प्रसिद्धी न करता धान्य वाटप केले जात आहे. तरी जनतेने लॉकडाऊन चे पालन करावे शेजारील जामखेड तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.सुदैवाने आपल्या मतदारसंघात रुग्ण नाहीत.त्यामुळे पुढील काळातही लॉकडाऊन चे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.कारण श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील अनेक नागरिकांचा शेजारील जामखेड व नगर शी संपर्क होत असतो.त्यामुळे आपण थोडी खबरदारी पाळली पाहिजे.

आपल्या मतदारसंघात कोणतीही कोरोना केस होणार नाही व त्यामुळे ज्या वेळेस लॉकडाऊन उठेल त्यावेळी आपला मतदारसंघ लवकरात लवकर पूर्वीसारखा पूर्वपदार येईल. या अडचणीच्या काळात केंद्र सरकारकडून गोरगरीब जनतेला मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. जनधन खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये तसेच उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन मिळालेल्या लाभार्थ्यांना मोफत गॅस दिला जात आहे.त्यामुळे जनतेने सरकारच्या आदेशाचे पालन करावे.असे आमदार पाचपुते म्हणाल.

त्याचबरोबर कुकडीच्या पाण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू आहे.तशा अडचणी ब-याच आहेत.आपल्या भागात कुकडीचे पाणी आठ दिवस उशिरा मिळाले.कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी नसल्याने खालील भागात पाण्याचा वापर थोडा जास्त झालेला आहे. अशी परिस्थिती असतानाही सद्यस्थितीत सर्वाना पाणी कसे देता येईल,यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाणी प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण भरणे करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत व त्यात यशही मिळेल शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.असे शेवटी आमदार पाचपुते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading