सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; भेटायला बोलावून श्रीगोंद्यातील तरुणाला पाच लाखांची खंडणी मागून मारहाण..!

दिनांक १४ सप्टेंबर २०२५, म्हाडा/श्रीगोंदा:

सोशल मीडियावर ओळख करून घेतलेल्या महिलेने भेटायला बोलावून श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील तरुणाला खंडणीसाठी डांबून ठेवत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ निंबाळकर (रा. ता. श्रीगोंदा) यानी कुर्दुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये शिंदे, काळे सह अनोळखी चार व्यक्ती आणि एक महिला यांचा समावेश आहे.

फिर्यादीस सोशल मीडियावर महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर दोघांची मैत्री झाली. ९ सप्टेंबर रोजी तिने ‘भेटायला या’ असे सांगत लोकेशन पाठवले. रात्री सुमारास तो कुर्दुवाडीत पोहोचला असता, महिलेबरोबर आलेल्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला चढवला.

त्याला जबरदस्तीने पत्राशेडमध्ये घेऊन जाऊन हातपाय बांधून ठेवण्यात आले. ‘तू दुष्कर्म केले आहेस; पाच लाख रुपये दे, नाहीतर ठार मारू’ अशी धमकी देत पट्टयाने मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या पत्नीस पैशासाठी फोन करायला भाग पाडले.

मात्र १० सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता पोलिस गाडीच्या सायरनचा आवाज ऐकून आरोपींनी भीतीपोटी त्याची सुटका केली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading