शालेय साहित्यांची भेट आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य


श्रीगोंदा =  अग्नीपंख फौडेशनने ज्या विद्यालयात मुलांपेक्षा मुलींची संख्या जादा अशा ढवळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील उपेक्षित कुंटुबांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट दिले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहावयास मिळले

बुधवारी ढवळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात उद्योजक गणेश साळुंके विकास आढाव अनिरुद्ध लाकुडझोडे यांचे हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. अंकुश कऱ्हे व प्रतिक्षा रोटकर यांची पोलीस काॅस्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला
विकास आढाव म्हणाले कि, आई वडीलांच्या सल्ल्यानुसार काम केले तर जीवन यशस्वी होते. माझे वडील निरक्षर पण त्यांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरले. यापुढे अग्नीपंख फौडेशनच्या शालेय उपक्रमांना मदत करणार आहे
गणेश साळुंके म्हणाले की समाज कार्याची शिकवण वडीलांकडूनच मिळाली यात मी समाधानी आहे.
मोहन आढाव म्हणाले की शाळा विद्यालये समाज परिवर्तनाची खरी माध्यमे आहेत यांना मदत करणे हेच अग्नीपंख फौडेशनचे ध्येय आहे. लवकरच शिक्षक मोटिव्हेशन कॅप व विद्यार्थी व खेळाडूंचा महोत्सव आयोजीत करण्याचा मानस आहे
यावेळी अग्नीपंखचे उपाध्यक्ष प्रा संजय लाकुडझोडे  बाळासाहेब पवार यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राचार्य मधुकर सुपेकर यांनी केले.
यावेळी सचीन कातोरे रमेश साळुंके किसन वऱ्हाडे जयश्री डोंगरे बाळासाहेब शिंदे तुकाराम बोरगे गौतम वांळुज माणिक ढवळे उपस्थित होते सुत्रसंचलन सुरेश शिंदे तर आभार सुनील डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading