दिनांक २० जानेवारी २०२६, बेलवंडी:
बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली घाटात वनविभागाच्या मोकळ्या जागेत एका अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू (अ.मृ. रजि. नंबर ०४/२०२६) म्हणून नोंद केली आहे.

महिलेचे वर्णन: वय: अंदाजे ४० ते ४५ वर्षे.,रंग: गोरा, उंची: ५ फूट, चेहरा: गोल..,पोशाख:अंगात गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचे ब्लाऊज.

विशेष खूण: गळ्यात तुळशीची माळ आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सदर महिला गेल्या ३-४ दिवसांपासून चिखली रोड परिसरात फिरताना दिसून आली होती. अद्याप तिचे नाव किंवा पत्ता समजू शकलेला नाही.

- संपर्क साधण्याचे आवाहन:
या महिलेबाबत कोणासही काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
१. बेलवंडी पोलीस स्टेशन: ०२४८७-२५०२३३
२. सपोनी नंदकुमार सोनवलकर: ९८९०३२७०७२
३. तपासी अंमलदार (पोहेकॉ जावेद शेख): ८८५७८८२२५५.. - स्रोत:(बेलवंडी पोलीस स्टेशन)
