दिनांक १७ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
आनंदवाडी (ता. श्रीगोंदा) येथील संकेत रावसाहेब गिरमकर (वय २०) हा तरुण शनिवारी दुपारी राहत्या घराच्या शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. १७ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास संकेतने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यास तातडीने लोकमान्य हॉस्पिटल, काष्टी येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नामदेव रामराव गिरमकर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बी. एस. गांगर्डे व पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत करत आहेत.
स्रोत:(आकस्मित मृत्यु नोंद)
