शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम निमित ताजिया ची स्थापना

श्रीगोंदा:

मोहरम पर्वात ताजिया स्थापनेची परंपरा आहे. श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचे गुरू सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे पारंपारीक रुढी परंपरेने चालत आलेल्या ताजिया स्थापनेची परंपरा शेख महंमद बाबा यांच्या वंशजांनी जतन करत कायम ठेवत सालाबाद प्रमाणे चालु वर्षी दि.१७ जुन २०२६ रोजी शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये पारंपारिक पद्धती नुसार ताबुत (ताजीया) ची स्थापना करण्यात आली आहे.

श्रीगोदा शहरात जावेद फकीर, राजु मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार , आदिसह श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी ताजिया व सवारी, पंजाची स्थापना करण्यात आली आहे.

शुक्रवार दि.२६ जुन २०२६ रोजी ताजिया (ताबुताचे) विसर्जन करण्यात येणार आहे.

रविवार दि.२८ जुन रोजी (तिजायत) दिवशी शेख महंमद बाबा दरबारात खिचाड्याचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शेख महंमद बाबा ट्रस्ट चे अध्यक्ष, शेख महंमद बाबा यांचे वंशज नगरसेवक आमीनभाई शेख यांनी केले आहे.


शेख महंमद बाबा दर्गा येथील मोहरम उत्सावासाठी
दौलतराव शिंदे घराण्याकडून निधी
 

मोहरम निमित्त शेख महंमद बाबाच्या दरबारात ताजिया (ताबुत) ची स्थापना केली जाते या उत्सवासाठी दौलतराव शिंदे घराण्याकडून निधी देण्यात येत होता त्याची सनद देखील उपलब्ध असुन शेख महंमद बाबा दरबारात मोहरमच्या निमित्त १० दिवस मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीयांकडून उत्सव साजरा केला जातो.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading