श्रीगोंदा: भिंगान येथे २० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला..

दिनांक १८ जून २०२६, श्रीगोंदा:

तालुक्यातील भिंगान येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका २० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज, १८ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घरातील लहान मूल रडत-रडत शेजाऱ्यांकडे गेले. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.

Shrigonda: The body of a 20-year-old married woman was found hanging in Bhingan.

या घटनेची माहिती तातडीने श्रीगोंदा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत महिलेचा मृतदेह खाली उतरवण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी तो श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. श्रीगोंदा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading