श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ‘एसीबी’चा मोठा धमाका! अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी लाच घेणारे ३ पोलीस कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात..

दिनांक १८ जून २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एका अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना ‘एसीबी’ने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

दादा म्हस्के, नितीन गाडगे आणि राजेश जाधव अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. आज दुपारी करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अपघाताच्या गुन्ह्यातील प्रकरणाची रीतसर नोंद करण्यासाठी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.

ACB raids Srigonda Police Station! 3 police personnel caught red-handed for accepting bribe to register accident case.

या कारवाईनंतर तिन्ही आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ‘एसीबी’च्या या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

स्रोत:(मिळालेल्या माहिती नुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading