दिनांक २ सप्टेंबर(मढेवडगाव,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्याच्या स्थितीत कपाशी पिकाचे प्रमाण जास्त प्रमाण आहे. (कृषी मंडळ अधिकारी) एस. आर.आरो मॅडम, (कृषीपर्यवेक्षक) के. एन. सांगळे, (कृषीसहायक) राहिंज आर. एच यांनी मढेवडगांव येथील प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत उपसरपंच सौ. जयश्री भगवान धावडे यांच्या कपाशी पिकाच्या प्रक्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आलेल्या कपाशी पिकाची प्रसंशा केली. तसेच, बोंडअळीबाबत मार्गदर्शन करून, सर्व कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना फेरोमोन सापळे भेट दिले आहेत.
तालुक्यातील मढेवडगांव परिसर या भागांतील कपाशी पिकांचे प्रक्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना श्रीगोंदा कृषी विभागामार्फत दिलेल्या संदेशानुसार उपाययोजना करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत (कृषी मंडळ अधिकारी) एस. आर. आरो मॅडम यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
माध्यमांशी बोलताना कृषी मंडळ अधिकारी आरो मॅडम यांनी कापूस पिकात किमान एकरी दोन फेरोमोन सापळे त्वरित लावून, त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास काय उपाययोजना करायच्या ? तसेच बोंडअळी नुकसान पातळी समजल्यानंतर प्रथम १० लिटर पाण्यात किनॉलफॉस (२५ इ.सी) प्रती डोस, दुसरी फवारणी २५ मिली थायडोकार्फ, (७५ डब्लूपी) व तिसरी फवारणी क्लोरोपायरीफास २५ मिली या कीटकनाशकांची फवारणी आलटून पालटून नमूद प्रमाणात फवारणी करावी. अशी माहिती दिली.
श्रीगोंदा कृषी विभागामार्फत शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा नमूद प्रमाणात वापर करावा. अशाप्रकारे मार्गदर्शन याठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे दररोज निरीक्षण करून कामगंध सापळ्यामधील पतंगाची संख्या मोजावी. वेचणी झाल्यानंतर (एक ते दीड महिन्यामध्ये) कापसावर आलेली बोंडाची संख्या व अपेक्षित उत्पन्न यांचा अंदाज घ्यावा. तसेच, डिसेंबर २०२० नंतर कापूस पीक काढून टाकावे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी (आदर्शगाव प्रणेते) प्रा. फुलसिंग मांडे, (सरपंच) महानंदा मांडे, (उपसरपं सौ. जयश्री भगवान धावडे, (ग्रामविकास अधिकारी) गोरक्षनाथ गायकवाड, (तंटामुक्ती समिती अध्यक्ष) सचिन उंडे, (ग्रा.प.सदस्य) राणी लक्ष्मण मांडे, दीपक गाडे, अमोल गाढवे, अंबादास मांडे, कुंडलिक मांडे, राजेंद्र शिंदे, संजय जाधव, सुखदेव धावडे, काळूराम ससाणे, बापू बर्डे, गणेश मांडे, भगवान धावडे, कल्याणी गाढवे, लक्ष्मण मांडे इ. शेतकरी बोंडअळी बाबत मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
(स्रोत): विजय मांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती.
