श्रीगोंदा मतदारसंघाचा राजकीय इतिहास: १९६२ ते २०१९..

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ साली प्रथमच विधानसभेची निवडणूक झाली. त्या वेळी २६४ मतदारसंघ अस्तित्वात होते, त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हा एक महत्त्वपूर्ण मतदारसंघ होता. प्रारंभी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बाबुराव भारस्कर यांनी केले. १९६२ ते १९७८ दरम्यान हा मतदारसंघ राखीव असला, तरी १९७८ मध्ये खुला करण्यात आला.

प्रारंभिक काळातील निवडणुका आणि परिणाम:

१९७८ मध्ये श्रीगोंदा खुला झाल्यानंतर काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडे यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी ४०,१०२ मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यांच्या विरोधात मोहनराव गाडे यांनी २७,०५४ मते मिळवली, तर अपक्ष उमेदवाराने १७०५ मते मिळवली. एकूण १,०९,१७४ मतदारांपैकी ६८,८६१ मतदारांनी मतदान केले होते.

१९८० मध्ये जनता पक्षाचे बबनराव पाचपुते हे २७,९९२ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे शिवाजीराव नागवडे यांना हरवले, ज्यांना २६,४७३ मते मिळाली होती.

१९८५ ते १९९५ दरम्यान बबनराव पाचपुते यांचा प्रभाव…

१९८५ साली बबनराव पाचपुते यांनी पुन्हा विजय मिळवला, त्यांना ५७,२५८ मते मिळाली. १९९० मध्ये देखील त्यांनी शिवाजीराव नागवडे यांच्यावर ८१८ मतांनी विजय मिळवला. १९९५ साली देखील पाचपुते विजयी झाले, ज्यांनी ६४,९५७ मते मिळवून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

१९९९ साली नागवडे यांचा पुनरागमन..

१९९९ मध्ये काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडे यांनी पाचपुते यांचा पराभव केला आणि ६४,७३८ मते मिळवून विजयी झाले. परंतु, २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी पुनरागमन करून विजय मिळवला.

२०१४ आणि २०१९ मधील महत्त्वपूर्ण बदल..

२०१४ मध्ये भाजपा-शिवसेना आघाडीचे राहुल जगताप हे ९९,२८१ मते मिळवून विजयी झाले. २०१९ मध्ये बबनराव पाचपुते पुन्हा विजय मिळवून आमदार झाले; त्यांनी १,०३,२५८ मते मिळवली, तर घनश्याम शेलार यांनी ९८,५०८मते मिळवून जवळजवळ त्यांना टक्कर दिली.

श्रीगोंदा मतदारसंघातील महिलांचा सहभाग.:

१९६२ ते २०१९ दरम्यान फक्त दोन महिला उमेदवारांनी श्रीगोंदा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली आहे.

स्रोत:(श्रीरंग साळवे सर)

जाहिरात…

Leave a Reply